आपल्या ज्येष्ठांना सन्मानाने आणि आदराने जगण्यासाठी मदत करूया
हेल्पएज इंडिया (HelpAge India) ही संस्था एजकेअर, आरोग्यसेवा, आपत्ती व्यवस्थापन, आजीविका, संशोधन आणि वकिली (प्रसार) यांसारख्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून, प्रत्येक आजी–आजोबाला समाजात त्यांचे हक्काचे स्थान मिळवून देण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे. प्रत्येक ज्येष्ठास स्वतःचे म्हणता येईल असे घर, त्यांना गरज असताना त्यांची काळजी घेण्यासाठी आणि सांभाळण्यासाठी माणसे, दारावरच उपलब्ध असलेली आरोग्यसेवा आणि आपुलकीची भावना यातून मिळणारी सुरक्षिततेची अनुभूती मिळायला हवी.
2025–26 मध्ये आपण मिळून घडवून आणलेल्या बदलांमध्ये तुमचाही महत्त्वाचा वाटा आहे.
तुमचा पाठिंबा आम्हाला भारताच्या कानाकोपऱ्यातील (अद्याप मदतीपासून वंचित राहिलेल्या) ज्येष्ठांपर्यंत पोहोचण्यास मदत करत आहे.
2,000,000
ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात परिवर्तन घडले
13,00,000
ज्येष्ठांना त्यांच्या दारावरच प्राथमिक आरोग्यसेवा मिळाली.
40,000
ज्येष्ठ नागरिकांच्या स्वयं–सहायता बचत गटांमुळे ते स्वावलंबी झाले.
1,25,000
ज्येष्ठांना ‘एल्डर हेल्पलाईन‘ द्वारे मदत मिळाली.
35,000
ज्येष्ठ नागरिकांना दृष्टी पुन्हा मिळवण्यासाठी मदत देण्यात आली.
77,000
ज्येष्ठांना डिजिटल, आर्थिक आणि कायदेशीर साक्षरता (ज्ञान) मिळाले.
तुम्ही घडवून आणलेला बदल
आपण एकत्र येऊन देशभरातील लाखो ज्येष्ठांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणू शकलो आहोत. हे ज्येष्ठ नागरिक आपल्या सर्वांसाठी आदर्श आहेत.
रमा’ जी यांना जिथे आपलेपणा मिळाला
आपले पूर्वीचे घर गमावल्यानंतर, 76 वर्षांच्या रमा जी ला हेल्पएज इंडियाच्या “ज्येष्ठ नागरिक गृह” मध्ये आपुलकीचे स्थान, उत्तम सांभाळनुक मिळाली. व पुन्हा एकदा तिच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली.अधिक वाचा
उपाध्याय यांना आधार मिळाल्याने अनिश्चितता कशी दूर झाली
हेल्पएज इंडियाच्या 'एल्डर हेल्प डेस्क'ने 82 वर्षीय श्री डी. पी. उपाध्याय यांना आत्मविश्वास, सन्मान आणि वेळेवर मिळणाऱ्या आधारासह आरोग्यसेवेचा लाभ घेण्यास मदत केली.अधिक वाचा
एकाकीपणातून नेतृत्वापर्यंतचा धनलक्ष्मी हिचा प्रवास
आपल्या वैयक्तिक दुःखातून सावरून हजारो ग्रामीण ज्येष्ठांचे नेतृत्व करणाऱ्या धनलक्ष्मी चा हा प्रवास दाखवून देतो की, कर्तृत्व आणि नेतृत्वाला वयाची कोणतीही अट नसते.अधिक वाचा
चंदा मैया यांच्या दारापर्यंत पोहोचली सुश्रूषा आणि माया
दीर्घकालीन आजाराशी एकट्याने सामना करणाऱ्या चंदा मैया यांच्यासाठी हेल्पएज इंडियाची 'मोबाइल हेल्थकेअर युनिट' (फिरते वैद्यकीय पथक) म्हणजे केवळ आवश्यक उपचारच नव्हे, तर मायेचा आधार आणि सोबतीचा एक मोठा दिलासा ठरली आहे. अधिक वाचापुथुरी यांना कसा मिळाला स्नेहाळ आणि मायेचा आधार
घरीच मिळणाऱ्या नियमित वैद्यकीय उपचार आणि काळजीमुळे, पुथुरी नरसैय्या यांच्या दैनंदिन आयुष्यातील संघर्षांची जागा आता एका सुकर, सन्मानजनक आणि आत्मविश्वासाने भरलेल्या जगण्याने घेतली आहे.अधिक वाचा
आमचे भागीदार
सहयोगी भागीदारांच्या दातृत्वामुळेच हेल्पएज इंडिया ला हे सामाजिक कार्य प्रत्यक्ष पातळीवर यशस्वीपणे राबवता येत आहे. अधिक माहितीसाठी, येथे भेट द्या:
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
मी तुमच्या संस्थेला देणगी कशी देऊ शकतो/शकते?
खालील लिंकवर क्लिक करून तुम्हाला देणगी देण्याची पसंतीची पद्धत निवडता येईल.
मी दिलेल्या देणगीवर मला करसवलत मिळेल का?
होय, तुम्हाला कलम 133 (पूर्वीचे कलम 80 जी) अंतर्गत 50% करसवलत प्रमाणपत्र मिळेल, जे तुमच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर किंवा टपाल पत्त्यावर पाठवले जाईल.
मला कलम 133 (पूर्वीचे कलम 80 जी) करसवलत प्रमाणपत्र कसे प्राप्त होईल?
देणगीची व्यवहार प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही देणगी देताना नोंदवलेल्या ईमेल पत्त्यावर हे प्रमाणपत्र पाठवले जाईल. पर्यायाने, देणगी देताना नोंदवलेल्या पत्त्यावर प्रमाणपत्राची हार्ड कॉपी (छापील प्रत) पोस्टाद्वारे पाठवण्यात येईल.
जर माझी कर सवलतीची पावती गहाळ झाली तर काय करावे?
कृपया तुमच्या देणगीचा तपशील नमूद करून दुय्यम पावती (Duplicate Receipt) मिळवण्यासाठी [email protected] वर ईमेल करा.
मी भारताबाहेरून देणगी कशी देऊ शकतो/शकते?
तुम्ही आमच्या ‘अमेरिकन फ्रेंड्स ऑफ हेल्पएज इंडिया’ या युएस (US) संस्थेच्या खालील लिंकवर क्लिक करून देणगी देऊ शकता: https://www.af-hi.org/donation/
माझ्या देणगीचा वापर कसा होतो?
तुमच्या पाठिंब्यामुळे आम्हाला भारतभरातील वंचित वृद्धांना आरोग्य सेवा, वृद्धसंगोपन (एजकेअर) तसेच उपजीविका आणि आपत्ती व्यवस्थापन या उपक्रमांतर्गत काळजी आणि सन्मानाचे आयुष्य देणे शक्य होते.
मी कोणत्या उपक्रमासाठी (कार्यक्रमासाठी) देणगी द्यायची हे स्वतः निवडू शकतो/शकते का?
होय, तुम्ही आमच्या देणगी अर्जातील (Donation Form) ‘ड्रॉप-डाऊन’ मेनूमधून तुम्हाला ज्या कार्याला पाठिंबा द्यायचा आहे त्याची निवड करू शकता.
मला हेल्पएजच्या आर्थिक व्यवहारांची/पारदर्शकतेची माहिती कुठे मिळेल?
आमच्या आर्थिक व्यवहारांची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा: https://helpageindia.org/documents/
मला पेमेंटचा तपशील अपडेट करायचा असल्यास किंवा पावतीत काही दुरुस्ती करायची असल्यास मी काय करावे?
पावतीमध्ये किंवा तपशिलामध्ये जे बदल करायचे आहेत, त्या माहितीसह कृपया [email protected] या पत्त्यावर ईमेल पाठवा.
काही शंका किंवा प्रश्न असल्यास कुठे संपर्क साधावा?
सामान्य चौकशीसाठी, कृपया [email protected] या पत्त्यावर ईमेल पाठवा.
आमच्या कोणत्याही राज्य कार्यालयाशी संपर्क साधायचा असल्यास, कृपया या लिंकला भेट द्या:
आमच्याशी संपर्क साधा
मला माझे फॉर्म 113 (पूर्वीचे फॉर्म 10BE) कधी मिळेल?
हे तुम्हाला पुढील आर्थिक वर्षात 31 मे नंतर तुमच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर किंवा टपाल (पत्ता) पत्त्यावर पाठवले जाईल.
आपल्या ज्येष्ठांना सन्मानाने आणि आदराने जगण्यासाठी मदत करूया.
For citizens with passports other than Indian, we prefer receiving donations through our US entity, American Friends of HelpAge India Website.
US Donors can avail 100% Tax Exemption in USA under 501 (c) (3) and EIN number is 83-3780707.
Kindly click on the submit button below, so that we can redirect you.
Donate Easily via
- Simply go to the Bill Pay section on BBPS enabled Interfaces:
- Paytm, PhonePe, BHIM, Google Pay & other UPI apps
- Any Nationalised or Private Bank
- Search for HelpAge India and donate instantly.
- Simple. Secure. Impactful.